Rashtra sahyadri: बधितांमध्ये संगमनेर येथील माय-लेकाचा समावेश…
नगर:
जिल्ह्यातील आणखी ०२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ८०. कर्जत आणि नेवासा तालुक्यातील व्यक्ती कोरोनामुक्त. मात्र, त्यांना काही दिवस हॉस्पिटल देखरेखीखाली ठेवणार.
जिल्ह्यात आणखी ०९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह. सर्व बाधित रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील
नगर शहरातील सहा जणांचा समावेश. यात काल बाधित आलेल्या मार्केट यार्ड मधील व्यक्तीच्या कुटुंबातील तिघे बाधित. यात आई, पत्नी आणि मुलीचा समावेश. याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित. माळीवाडा येथील 42 वर्षीय पुरुष आणि केडगाव येथील 29 वर्षीय युवक यांनाही कोरोनाची लागण.
संगमनेर शहरातील जुने पोस्ट ऑफिस येथील 36 वर्षाची महिला आणि अडीच वर्षे वयाचा मुलगा बाधित.
अकोले तालुक्यातील बोरी येथील साठ वर्षीय महिला बाधित.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १७२
(महानगरपालिका क्षेत्र ३२, अहमदनगर जिल्हा ९०, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४०)
जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ८२ (+०२संगमनेर)
एकूण स्त्राव तपासणी २६९७
निगेटीव २३९७ रिजेक्टेड ०२५ निष्कर्ष न निघालेले १७ अहवाल बाकी ०३
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)