प्रतिनिधी। राष्ट्र सह्याद्री
मुंबई। कोल्हापूरः

फेडेक्स कंपनीचे कार्गो विमान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धावपट्टीवरून घसरले.
हे विमान बेंगळुरूहून आले होते. कुठलीही जीवितहानी नाही.
विमान बाजूला करण्यात आले.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सायंकाळी साडेसात पर्यंत बंद.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात,
मदत व बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश वादळाने दिशा बदलली असली तरी मुंबईचा धोका अद्याप टळलेला नाही वादळाचा चकवा;
मुंबईकडे येता-येता ठाणेमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे सरकले!
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील चौपट्यांना भेट देऊन घेतला सद्यस्थितीचा आढावा
संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मुंबई पोलीस व महापालिकेकडून जोरदार तयारी
मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळील सुमारे २५ हजार झोपडीधारकांना महापालिकेनं सुरक्षित स्थळी हलविलं
मुंबईच्या विविध भागांत मागील २४ तासांत तब्बल ३७ वृक्ष कोसळले!
महापालिका व एनडीआरएफनं दिलेल्या सूचनांचं पालन करा…
क्रिकेटपटू सुरेश रैना याचं नागरिकांना आवाहन… पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. घरातच राहा. अफवा पसरवू नका…
अभिनेता संजय दत्त याचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या मदतीसाठी उतरावे, निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं आवाहन
निसर्गची मुंबईच्या दिशेनं कूच, पुढच्या काही तासांत धडकणार
रायगड: लोणारे येथील आंबरले गावातील १ डीपी आणि ३ उच्च दाब खांब कोसळले.
वडचा कोंद गावातील 1 डीपी व ३ निम्न दाब खांब कोसळले
निसर्ग वादळाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती
निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचं नागरिकांना सहकार्याचं आवाहन