प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अकोले – शेतात इलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोले पोलिसांनी गणेश ज्ञानेशवर हुलवळे (चैतन्यपूर ता. अकोले ) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले पोलिसांत एका ३९ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून यामध्ये तिने असे म्हटले आहे की, फिर्यादी महिला ही त्यांचे शेत गट नंबर 218 मध्ये चैतन्यपूर येथील विहिरीवर इलेक्ट्रॉनिक मोटर चालू करण्यासाठी गेले असता आरोपी गणेश हुलावळे हा फिर्यादी महिलेस म्हणाला की तू मोटर चालू करायची नाही, असे म्हणून आरोपी याने फिर्यादी महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी शेतात जवळच असलेला महिलेचा मुलगा हा तेथे आईस सोडवण्यासाठी आला असता आरोपी याने मुलाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली. तुम्ही जर परत या विहिरीवर आले तर तुम्हाला जिवंत मारून टाकीन अशी धमकी दिली. अशा फिर्यादीवरून आरोपी गणेश हुलावळे याचे विरुद्ध गु.र.जी.न-182/2020 भा.द.वि.क 354,323,504,506 प्रमाणे अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.