कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली दोनशे जवळ

1

वशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

एकाच दिवसांत पुन्हा 18 रुग्ण संगमनेर, नगरमध्ये वाढती संख्या

नगर/पारनेर/बोधेगाव : बुधवारी कोरोना मीटर डाऊन झाले असताना आज ते पुन्हा सुपरफाष्ट झाले आहे. एकाच दिवशी 18 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 195 झाली आहे. सकाळच्या अहवालात सहा नवीन रुग्ण आढळळे, तर सायंकाळी आलेल्या अहवालात 12 नवीन रुग्ण आढळले.आज दिवसभरात 18 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. जिल्ह्यातील 90 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राहाता तालुक्यातील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली. काल बाधित आलेल्या रुग्णाच्या संपर्कात तो होता.
नगर शहरातील माळीवाडा, मार्केटयार्ड, भवानीनगर परिसरात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आज त्यात सात रुग्णांची भर पडली असून पुन्हा एकदा नगर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. हे कुटुंब माळीवाड्यातील आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले आहे. त्यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय मार्केटयार्डमधील 37 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. नगर-कल्याण रस्त्यावरील लालनगर भागातील एका 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. यापूर्वी बाधित आलेल्या रुग्णाचे ते वडील आहेत.
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. बाधिताच्या पत्नीचाही अहवाल कालच आला होता. त्याही कोरोनाबाधित झाल्या आहेत. भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या 55 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शेवगाव तालुका कोरोनामुक्त होता; परंतु आता तेथे मोठया संख्येने रुग्ण आढळत आहेत. कळंबोली (नवी मुंबई) येथील चार क्रमांकाच्या सेक्टरमधून पाथर्डीत आलेल्या 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणीतील दहा वर्षांचा मुलगा तर 28 वर्षीय युवती कोरोनाबाधित आढळली आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील 18 वर्षांचा युवक तर नवघर गल्लीतील बत्तीस वर्षे युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे.परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्रे दाखल
शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे यांनी राणेगावच्या सीमा दहा जूनपर्यंत सील करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र राणेगावच्या सीमा अद्यापर्यंत बंद केलेल्या नाहीत. आरोग्य विभागाने घरोघर जाऊन तपासणी सुरू केली आहेत. ग्रामस्थ गावच्या बाहेर येजा करत आहेत. इतर गावचे ग्रामस्थ या गावात येत आहे. येथील ग्रामस्थ कंटेन्मेंट झोनचे कुठलेही नियम पाळत नाहीत. सर्व रहदारी ही खुलेआम चालू आहे.
परगावाहून आलेल्यांची माहिती कळवा
बाहेरगावांहून कोणीही परवानगी न घेता आलेले असेल, तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल, पोलिस किंवा आरोग्य विभागाला माहिती दिली, तर लगेच विलगीकरण कक्षात सोय, तपासणी करणे शक्य होईल. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालता येईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here