विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राइस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारी
मुंबई : कोरोना विषाणूच्या काळात लागू केलेल्या टाळेबंदीदरम्यान सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे. जीवननावश्यक वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. तांदूळ, मैदा, डाळी, बटाटा, कांदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती उतरल्या आहेत. या वर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन वाढले झाले असून तर दुसरीकडे मागणी कमी होत असल्याने किंमती कमी उतरत आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राइस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारीनुसार 114 रुपये प्रतिकिलो दर मिळणार्या उडदाच्या डाळीची किंमत 108 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचली आहे. त्याचबरोबर मूगडाळच्या किंमतीत गेल्या एक महिन्यांत प्रतिकिलो पाच रुपयांची घट दिसून आली आहे. 31 रुपये प्रतिकिलोला मिळणार्या टोमॅटोच्या किंमतीही 12 रुपयांनी घसरल्या आहेत. कोरोना संकटाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सतत कमी झाल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राइस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारीनुसार गेल्या एक महिन्यात किंमतींमध्ये घट झाली आहे. मैदा, मसूर, तांदूळ, खाद्यतेल, बटाटे, कांदे, टोमॅटो स्वस्त झाले आहेत. 29 रुपये किलो असणारी तांदळाची किंमत एका महिन्यात दोन रुपयांनी घसरून 27 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पिठाची किंमतीतही घट झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर 86 रुपये प्रतिकिलो हरभरा डाळीची किंमत एक महिन्यात 76 रुपयांवर आली आहे. या व्यतिरिक्त, एका महिन्यात 106 रुपये
