13 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित ः प्रशासक नियुक्त करणार

0

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान घेण्यात येणार्‍या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगास नुकतीच करण्यात आली होती. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ म्हणाले, की राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, मतदान यंत्राचा सामूहिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरू शकते. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदींसाठी मोठा वेळ लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील सहा महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत विनंती राज्य शासनातर्फे राज्य निवडणुक आयोगास केली होती.
राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे, की निवडणूक आयोगाच्या 17मार्च 2020 रोजीच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here