प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा जवळील महालक्ष्मी हिवरे आणि म्हाळस पिंपळगाव परिसरात बिबटयाने हैदोस घातला असून पाच शेळ्या आणि कुत्रफस्त केले आहे त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या तर एक पाळीव कुत्रे फस्त केले तसेच म्हाळस पिंपळगाव येथे एक शेळी बिबट्याने फस्त केली त्या मुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महालक्ष्मी हिवरा येथील अशोक गणपत रणबावरे यांच्या ग.न.135 मध्ये राहत असलेल्या आपल्या शेतातील वस्तीवरून मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने जाळीच्या आतील बांधलेल्या चार शेळ्यावर हल्ला चढवत त्यांना ठार केले बिबट्याने शेडजाळी शेजारी असलेल्या हौदावर चढून जाळीच्या आत मध्ये प्रवेश केला व चार शेळ्यावर ताव मारला त्या जाळीच्या शेडमध्ये आणखीही काही शेळ्या व बकरे बांधलेले होते. बिबट्याचे रौद्ररूप पाहून इतर शेळ्या व बकरे जोरजोराने ओरडू लागली शेळ्या चा आवाज का येतोय म्हणून अशोक रणबावरे हे घराबाहेर आले तर त्यांना बॅटरीच्या प्रकाशात शेळ्या च्या शेड मध्ये बिबट्या दिसला त्यांनी आरडाओरड केली व घरातील लोकांच्या ओरडण्याने तो बिबट्याने धुम ठोकली नंतर तो बिबट्या खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र नानासाहेब गायके यांच्या वस्तीवर गेला व त्या ठिकाणी त्या बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली व ते कुत्रे फस्त केले तसेच म्हाळस पिंपळगाव येथील ग.न.435 मध्ये वस्तीवर राहणारे नवनाथ उद्धव कर्डिले यांची जाळीच्या शेडच्या आत मध्ये बांधलेली मोठी शेळी जाळीच्या खालून मोठा खड्डा करून त्या मध्ये आत प्रवेश केला शेळीला फस्त करून शेळी जाळी खालून ओढून तीनशे-चारशे फुटाच्या अंतरावर उसात घेऊन गेला. या बिबट्याच्या दहशतीने महालक्ष्मी हिवरा तसेच म्हाळसपिंपळगाव परिसरात घबराट पसरली असून वन विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोन्ही गावातील घटनास्थळी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.