प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
कोपरगाव : नुकत्याच झालेल्या वादळाने तालुक्यातील शहाजापूर येथील शेताच्या बांधावरील पडलेल्या झाडाची तोडणी सुरु असल्याच्या कारणावरून गज आणि काठ्यांच्या सहाय्याने जबर मारहाण केल्याची फिर्याद युनूस अब्बास सय्यद (वय-59) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी खलील अब्बास सय्यद या सह आठ आरोपिविरुउद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी युनूस सय्यद व आरोपी खलील अब्बास सय्यद यांची शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत शेजारी-शेजारी जमीन आहे.नुकत्याच झालेल्या वादळाने.फिर्यादी यांच्या बांधावरील एक बाभळीचे झाड पडल्याने शेतमशागतीसाठी त्याची अडचण नको म्हणून ते फिर्यादी इसम तोडत असताना आरोपी खलील अब्बास याने गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून झाड तोडू नको म्हणून आरोपीने फिर्यादी युनूस सय्यद व साक्षिदार यांना गजाने काठीने, डोक्यात, पायावर, पाठीवर मारून फिर्यादीचे उजवा पायाचे हाड टिचवले आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे व साथीचा रोग सुरु असतानाही आरोग्यास धोका होईल असे वर्तन केले आहे. फिर्यादी खाजगी रुग्णालयात उपचार घेताना फिर्यादी दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु. र. नं.136/2020 भा. दं. वि.कलम 326, 143, 148, 149, 323, 504, 506, 188, 269, 270 साथीचे आजार अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 प्रमाणे आरोपी खलील सय्यद, मुनिर अब्बास सय्यद पटेल, अतिक मुनिर सय्यद पटेल, तौफिक मुनीर सय्यद पटेल, दातीश खलील सय्यद पटेल, अर्षद खलील सय्यद पटेल, अंजुम खलील सय्यद पटेल, तस्लिम मुनिर सय्यद पटेल आदी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. एस. एन. भताने हे करीत आहेत. या घटनेत फिर्यादी स्वतः गंभीर जखमी असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.