महिला आघाडी उपजिल्हाप्रमूख स्मिता सावंत (मांडरे) यांची माहिती
प्रतिनिधी | आनिल पाटील | राष्ट्र सह्याद्री

राज्यात निर्माण झालेल्या रक्तच्या तुटवड्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 82 जणांनी रक्तदान केले, अशी माहिती महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमूख स्मिता सावंत (मांडरे) यांनी दिली. कोल्हापूरचे खासदार संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शिबिरात महिला पोलिसांनी रक्तदान केले. वैभव लक्ष्मी ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले.
यावेळी माजी आमदार सूजीत मिणचेकर’ प्रतिमा सतेज पाटील’ परिवहन सभापती प्रतिज्ञा ऊत्तूरे ‘नगरसेवक नियाज खान’ नगरसेवक राजसिंह शेळके ‘यूवासेनेचे जिल्हाध्यक्ष मंजित माने ‘यूवा नेते हर्षल सूर्वे’ उपजिल्हाप्रमूख सूजित चव्हाण ‘महिला आघाडीच्या अध्यक्षा शूभांगी पवार ‘हेमा सपाटे’ प्रिती कूरूंदवाङकर ‘प्रिती मांडरे ‘दीपाली शिंदे’ गितांजली गायकवाङ ‘मेघना पेडणेकर अवधूत साळोखे ‘शहर प्रमूख शिवाजी जाधव आदीसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
आभार महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत(मांडरे) यांनी मानले.