Shirurkasar : स्टेट बँकेत शॉर्टसर्किटने आग; लाखोंचे नुकसान

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शिरूरकासार-तालुक्यातील सर्वात जास्त महत्त्वाच्या असलेल्या स्टेट बँक शाखेत शनिवारी (दि.6) मध्यरात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात नव्हे तर देशात विश्वसनीय बँक म्हटले तर स्टेट बँकेचा नंबर आहे. आजही नोटाबंदी नंतरही सर्वसामान्यांचा विश्वास असल्याने रांगेत राहून आपली रक्कम काढतात. शनिवारी सर्व कर्मचारी आपले आटोपून घरी गेले. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास शाँर्टसर्कीटमुळे बँकेत आग लागली.

आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे या आगीत दोन कॅश काऊंटर, तीन संगणक संच, दोन प्रिंटर, दोन कॅश काऊंटिंग मशीन, एअर कंडिशनर, सहा सी.सी.टि.व्ही.कॅमेरे, तीन फॅन, बारा ट्यूबलाईट, वायरिंग, पी ओ पी असे मिळून जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here