प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
देवळाली प्रवरा येथे गावठी हात भट्टी दारु अड्ड्यावर रविवारी पहाटे धडक कारवाई करुन 450 लिटर कच्चे रसायण 50 लिटर गावठी दारु नष्ट केली. सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती आशी की, देवळाली प्रवरा भिलवाडा, वडारवाडा भागात गावठी दारु अड्डे असून पोलिसांनी रविवारी पहाटे 5 वाजता गावठी दारु अड्ड्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारावाईत चार दारु विक्रेत्यांची कच्चे रसायन व तयार दारु नष्ट करण्यात आली. 450 लिटर कच्चे रसायण व 50 लिटर तयार दारु नष्ट करुन चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बाळासाहेब भाऊसाहेब गायकवाड, तात्या दादा गायकवाड, गोरख बबन गायकवाड , बबन बंडू पवार सर्व रा. देवळाली प्रवरा आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांचे पथकासह पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पठारे पोलीस नाईक वाल्मीक पारधी पोलीस नाईक संजय जाधव पो. कॉ. गणेश फाटक पो. कॉ . दादासाहेब रोखले व पो. कॉ. प्रवीण अहिरे आदी सहभागी झाले होते.