प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – शहरातील झमझम कॉलनी येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून बीड शहरातील झमझम कॉलनी येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला १ रुग्ण आढळून आल्याने झमझम कॉलनी येथील युनुस अत्तार (साद प्राईड) यांच्या घरापासून मुस्ताक फारूकी गुलाब हक्कानी यांच्या घरापर्यंतचा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
i love this wonderful article