प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
केंद्र सरकारने लॉकडाऊन हळूहळू उघडण्यास सुरुवात केली असून आज सबंध देशात धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होत आहे. तर महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम म्हणत मिशन बिगन अगेन सुरु केले आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही.

10 टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालयं सुरु होणार आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी मुंबईत बेस्ट सुविधा सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत. तर कन्टेनमेंट झोन सर्व 30 जून पर्यंत बंदच राहतील.