Ahmednagar Corona Updates : संगमनेर, शेवंगावच्या दोन महिला बाधित; 15 कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या 217 वर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्ह्यातील संगमनेर व शेवगाव येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली असून 15 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या 217 वर पोहोचली असून महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १११, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४९ जण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण स्त्राव तपासणी ३०७३, निगेटीव  २७३७, रिजेक्टेड २७,  निष्कर्ष न निघालेले १८, अहवाल बाकी ७९ जण आहेत.

मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे. वाशी मुंबईहून आलेल्या मेरी रोड शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर येथील खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या ०३ रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश.

जिल्ह्यातील १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त आज त्यातील १३ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला. यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत – ०२, अकोले ०२, नगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्हयातील अॅक्टिव केसेस 70 आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here