Corona: डॉक्टरांच्या चिरंजीवानंतर रिसेप्शनिस्ट कोरोनाबधित..!

0

तपासलेल्या 62 संशयितांपैकी 43 जणांचे अहवाल प्राप्त

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

रंकाळा टॉवर येथील कोरोना संसर्ग झालेल्या डॉक्टरच्या रूग्णालयातील रिसेप्शनिस्ट महिलेचा कोरोना अहवाल आज (सोमवार) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या महिलेचे माहेर बुधवार पेठ असून सासर अंबाई टँक येथे आहे. हे दोन्ही परिसर सील करण्यात येत आहेत.

काल (रविवार) रंकाळा टॉवर येथील डॉक्टरला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या हायरिस्क संपर्कातील सुमारे ६२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. यामधील ४३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये रूग्णालयातील रिसेप्शनिस्ट महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेच्या संपर्कात असलेला बुधवार पेठ आणि अंबाई टँक परिसर आरोग्य विभागाचे पथक आणि पोलिस यांच्याकडून सील करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here