प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालना – सिंदखेड रोडवर एका मिनी ट्रकला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना जालन्यापासून सिंदखेडरोडवर 3 किमी अंतरावर घडली.

धडक देणारे वाहन भरधाव वेगाने फरार झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मिनी ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, पोलीस अज्ञात वाहनाचा तपास करीत आहेत.