Rahata : सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शहरातील व्यवहार सुरू 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहाता – केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शहरातील व्यवहार सकाळी ९ ते ५  या वेळेत सुरू करण्याचा निर्णय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवहार काही शर्थी आणि अटीवर यापूर्वी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र आणि राज्य सरकारने अनलाॅकचा दुसरा टप्पा सुरु केल्यानंतर राहाता शहरातील व्यवहार नवीन निर्देशाप्रमाणे सूरु करण्यासाठी आमदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात व्यापारी आणि अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्षा ममता पिपाडा, प्रांताधिकारी गोविंद शिंदे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे तहसीलदार कुंदन हिरे मुख्याधिकारी निकम गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे रघूनाथ बोठे राजेंद्र पिपाडा राजेंद्र वाबळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाच्या नविन नियमाप्रमाणे शहरातील व्यवहार सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असल्याचे स्पष्ट करतानाच रविवार आणि गुरूवारी सुद्धा दुकाने सुरू ठेवाण्यास परवानगी असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने काही व्यवसायावरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. यामुळे हाॅटेल व्यावसायिकांनी होम डिलेव्हरी सुरू ठेवावी. फक्त मिठाई आणि इतर खाद्य पदार्थाच्या दुकानांतून पदार्थ फक्त  मोजून देण्यास परवानगी देण्यात आली. सलून पान मसाल्याची दुकाने उघडण्यास परवानगी नसल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.
शहरातील भाजी बाजार भरविताना नगरपरिषदेने नियोजन करुन द्यावे. प्रत्येक व्यावसायिकांनी सोशल डिस्टसिंग  सॅनिटायझर आणि मास्क सक्तीने वारण्याची सूचना आमदार विखे पाटील यांनी बैठकीत केली. राहाता शहर आणि तालुक्यातील सर्वच नागरिकांनी कोरोन् संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली. महसूल आरोग्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामसेवक तलाठी आणि आशा सेविकांनी जीवावर उदार होऊन केलेल्या कार्याचा आ.विखे पाटील यांनी कृतज्ञतापुर्वक उल्लेख करून त्यांचे या बैठकीत अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here