। दळणवळणाचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
शिरूरकासार : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यसरकारने सर्वत्र लाँकडाऊन केले त्यामुळे दळणवळणाच्या द्रष्टीने महत्त्वाची असलेली लालपरी एसटी महामंडळाने स्टाँप केली होती. परंतु सोमवारी शिरूरकासारला तब्बल आडीच महिन्यानंतर दर्शन दिले. देशासह जग हादरून सोडलेल्या कोरोना या विषाणुने सर्वांनाच हैराण करून सोडले. लहानांपासून वयोवृद्धापर्यंत मानसाला मानुसपण शिकवले असले तरीअति भितीदायक वातावरण तयार झाले असुन या पुढे ही सर्वांनी शोसल डिंस्टींचे अंतर पाळलेच पाहिजे. राज्यसरकारनेकाही प्रमाणात मोकळीक दिली असली तरी कोरोनाचा विळखा वाढतच चालला असुन सोमवारी सरकारने मोकळे सोडले त्यामुळे जिल्हा अंतर्गत वाहतूक सेवा सुरू झाली त्यामुळे सोमवारी शिरूरकासारला एसटी महामंडळाची लालपरी आली परंतु तब्बल आडीच महिन्यानंतर ति आल्याने ती ला डोळे भरून पाहिले दिवसात बीड-शिरूरकासार हे अंतर46कि मी चेअसल्याने चार खेपा केल्या परंतु महामंडळाला म्हणवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी या पुढे महामंडळाने बीड-शिरूरकासार हि लालपरी कायम ठेवावी. अशी मागणी होताना दिसत आहे.