प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगरः निसर्ग वादळाच्या काळानंतर मृगाच्या पावसाने शहर व परिसरात हजेरी लावली. माॅन्सूनपूर्व पावसामुळे पेरणीपूर्व मशागती उरकलेल्या शेतक-यांना आता खरीप हंगामाच्या पेरण्या करता येतील. सुमारे एक तासभर हा पाऊस कोसळत होता.
गेल्या काही दिवसांपासून माॅन्सूनच्या प्रगतीबाबत उलटसुलट बातम्या येत होत्या. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. नगरचा समावेश असलेल्या क्षेत्रात १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज होता. अंदाजाप्रमाणे मृगाचा पाऊस नगरमध्ये बरसला. या पावसाने शेतक-यांना आनंद झाला आहे. पाऊस पडता झाल्याची भावना मोठी असते. आता वापसा झाल्यानंतर पेरण्यांची लगबग सुरू होईल.
एकीकडे पाऊस बरसत असताना दुसरीकडे घामाच्या धाराही निघत होत्या. त्यामुळे आणखी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत होती.