Human Interest : कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने पत्नी व चिमुकल्यांना गमावले

1

कार विहिरीत पडून पत्नी व दोन मुलांचा डोळ्यांदेखत मृत्यू; शॉर्टकट ठरला जीवघेणा

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाने आपल्या पत्नी व दोन चिमुकल्यांना गमावले. ही दूर्घटना पुण्याच्या हवेली तालुक्यातील अष्टपूर जवळ मंगळवारी (दि.9) घडली. 

शितल कोतवाल, 9 वर्षीय मुलगी सृष्टी आणि 6 वर्षाच्या शौर्यचा अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर पती सचिन कोतवाल हे प्रसंगावधान राखल्याने (Pune Car Drown In Well) बचावले आहेत.

सचिन कोतवाल हे पत्नी शितल व दोन्ही मुलांसह मंगळवारी राहू या आपल्या सासूरवाडीवरून परत येत होते. यावेळी अष्टपूरजवळ त्यांनी मुख्यमार्गाऐवजी अरूंद असलेला शॉर्टकट रस्ता निवडला. नेमका हाच शॉर्टकट कुटुंबियांच्या जीवावर बेतला. या मार्गाने जाताना त्यांच्या गाडीला एक कुत्रे अडवे आले. या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी रस्त्यालगतच्या विहीरीत कोसळली. या विहिरीला कठडे नसल्याने कार थेट विहीरीत जाऊन बुडाली.

प्रसंगावधान राखल्याने सचिन कोतवाल बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी व मुलांना वाचविण्यासाठी मोठी धडपड केली. मात्र, कारची काच बंद असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. गाडीला आडवे आलेले कुत्रा तर बचावला. पण कोतवाल यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पत्नी शितल व मुलगी सृष्टी व मुलगा शौर्य याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, संपूर्ण कोतवाल कुटुंबियावर शोककळा पसरली असून  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

1 COMMENT

  1. राष्ट्र सह्याद्री वरिल न्युज अनोख्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here