Kolhapur : राशिवडेत बिबट्याचा हल्ला; ९ बक-या फस्त; 10 जखमी; 44 बेपत्ता

0

यशवंत सेना जिल्हाध्यक्ष संजय वाघमोडे यांची तत्काळ घटनास्थळी भेट

प्रतिनिधी | अनिल पाटील | राष्ट्र सह्याद्री 

कोरोना महामारी जिल्हाबंदीमुळे हैराण झालेल्या मेंढपाळ विलास शिवाजी जोंग राशिवडे ता.राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांच्या मेंढरांच्या कळपावर आज बुधवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने 9 बक-या फस्त केल्या असून १० जखमी तर ४४ बेपत्ता झाल्या.

घटनेची माहिती मिळताच संजय वाघमोडे यशवंत सेना, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर तातडीने घटनास्थळी यांनी धाव घेऊन. डॉ. पठाणे उपसंचालक पशूसंवर्धन कोल्हापूर यांना व राधानगरी वनविभागाचे आर एफ ओ बिराजदार यांना फोनवरून कल्पना देऊन वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून ताबडतोब वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करावा तसेच पंचनामा करताना वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी हे ज्या बकऱ्यांवर हल्ला झाला त्याचे अवशेष पाहिल्याशिवाय पंचनाम्यात घेत नाहीत. काही वेळा वन्यप्राणी कळपाने येऊन हल्ला चढवतात. काही बकऱ्यांना सोबत घेऊन लांब नेऊन त्यांचा फडशा पाडतात. तेव्हा हल्ला झालेल्या बकऱ्यांचे अवशेष मिळत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ यांना नुकसान भरपाई कमी मिळते. तरी बेपत्ता बकऱ्यांचीही नुकसान भरपाई मिळावी नाहीतर वन कर्मचाऱ्यांनी ती शोधून काढून मेंढपाळ यांना द्यावी, अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली.

यावेळी घटनास्थळी सरपंच, तलाठी, मंडलविस्तार अधिकारी, पशुसंवर्धन विस्तारधिकारी, वनाधिकारी व वनकर्मचारी, अरुण फोंडे, यशवंत सेना भुदरगड तालुका अध्यक्ष, दत्ता जोंग, अध्यक्ष धनगर समाज राशिवडे आण्णा जोंग, रामचंद्र जोंग सर्जेराव जोंग काशिनाथ जोंग धनगर समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here