Shrigonda : राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय हिरवे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा  – पारगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय सखाराम हिरवे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सामजिक अंतर ठेवून निवड झाली आहे.

बुधवारी माजी आमदार राहुल जगताप यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी माजी आमदार राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम स्थळी प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांनी दत्तात्रय हिरवे यांना निवडीचे पत्र दिले.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, श्रीगोंद्याचे नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नगरसेवक मनोहर पोटे, युवक नेते स्मितल वाबळे, समीर बोरा, अख्तर शेख, तुळशीराम जगताप, ऋषिकेश गायकवाड, बापुसाहेब सिदनकर,अक्षय काळे उपस्थित होते.

दत्तात्रय हिरवे हे पारगाव सुद्रीक येथील द्राक्षे, डाळिंब बागायतदार असून ते नेहमीच तालुक्याबरोबरच जिल्ह्यात मार्गदर्शन व सेवा देण्याचे काम करतात. तसेच ते वारकरी संप्रदायाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यांच्या निवडीबद्दल पारगावचे सरपंच बबनराव बोडखे, बाळासाहेब मोटे, रघुनाथ दानवे राजेंद्र निंभोरे, दिलीप शिंदे, संभाजी देशमुख, बंडू मोटे, भीमराव मोटे, शिवाजी जगताप यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here