85 वर्षांच्या आजीने हरविले कोरोनाला

0

दोघांना नव्याने बाधा; वीस जणांना सोडले घरी

कोरोनामीटर
बाधित रुग्णांची संख्या- 228
कोरोनामुक्त- 161
कोरोनामुळे मृत्यू-15
उपचार सुरू असलेले-52

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नगर : श्रीगोंद्यातील एका 85 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दोन जणांना बाधा झाली आहे, तर वीस जणांनी कोरोनावर मात केली. त्यात या आजींचा समावेश आहे. त्यांच्या जगण्याच्या जिद्दीचे सर्वांनीच कौतुक केले. या आजी मुंबईहून श्रीगोंदे तालुक्यातील कोंडेगाव येथे आल्या असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटले आहे; मात्र या 85 वर्षीय आजींनी कोरोनाशी यशस्वीपणे दोन हात केले आणि त्या कोरोनामधून पूर्णपणे बर्‍या झाल्या आहेत. त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर 85 वर्षांच्या आजीबाई कोरोनातून बर्‍या झाल्या. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचार्‍यांनी त्यांचे कौतुक केले. कोरोनामुळे वयस्कर लोकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड असल्याने 65 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोना अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच वयस्कर लोकांची (पान नं.2 वर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here