शिक्षक बँकेने सर्व कर्जावरील व्याजदर 9 टक्के करावे; सभासद हिताचा दिखावा : काटकर
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकबँकेत सत्तेत असूनही आगामी निवडणुका सामोरे ठेवून गुरुमाऊली मंडळाकडून सभासद हिताचा दिखावा करण्यात येत असून गुरुमाऊली मंडळाने सभासदांची दिशाभूल थांबावा व सर्व कर्जावरील व्याजदर 9 % करावा अशी मागणी आयडियल बहुजन टीचर्स असोशिएशन (इब्टा)चे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ व जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर यांनी केले आहे.
इब्टा संघटनेच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जिल्हा कार्याध्यक्ष .विजय काटकर यांनी म्हटले आहे की, शिक्षक बँक सत्ताधारी व संचालक मंडळ सभासदहिताला हरताळ फासण्याचे काम करीत असून त्यांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी. सामान्य सभासदांना कर्जावरील अधिकच्या व्याजदराचा भुर्दंड सहन करावा लागत असून शिक्षक बँकेने मुदतठेव, बचतठेव, रिकरिंग ठेविवरील व्याजदर कमी केलेला आहे आणि या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार कायम ठेवीला 7.25 % व्याज मिळणार आहे म्हणजेच कायमठेवीवर सुद्धा 0.75 % कपात होणार आहे. त्यामुळे शिक्षक बँकेने सभासदांच्या सर्व कर्जावरील (जामीन कर्ज, वाहन कर्ज, गुहकर्ज ) व्याजदर 9 टक्के करण्यात यावा अशी मागणी बहुजन मंडळाचे अध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी केली आहे.
गुरुमाऊली मंडळाच्या गटातटाच्या राजकारणामुळे, आरोप-प्रत्यारोपमुळे शिक्षकांची बदनामी होत आहे. .रोहकले गुरुजी चेअरमन असताना इब्टाप्रणित बहुजन मंडळ, गुरुकुल मंडळाने वेळोवेळी मागणी करूनही सभासद हिताला, व्याजदर कपातीला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आता सत्तेत असून स्व:ताच्या मंडळाचा व्हा चेअरमन असूनही व्याजदर कपातीसाठी निवेदन किंवा आंदोलन देणे म्हणजे नौटंकी आहे अशी टीका काटकर यांनी केली आहे.
शताब्दी वर्षानिमित्त सभासदांना कोणतीही भेट वस्तू न देता शताब्दीची उर्वरित रक्कम सर्व सभासदांच्या सेव्हींज खात्यात जमा करावी अशी मागणी बहुजन मंडळाने वेळोवेळी करूनही संचालक मंडळाने संगनमताने ‘भ्रष्टाचाराचे घड्याळ सभासदांच्या माथी मारले’ आणि आता रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाकडून घड्याळ खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे उंदराला मांजर साक्ष किंवा तू मारल्यासारखे……. मी रडल्यासारखे करतो असा प्रकार असून हा सत्तेतील, घड्याळ खरेदीतील अधिकचा आर्थिकवाटा घेण्यासाठी खटाटोप आहे, असा आरोप काटकर यांनी केला आहे.
सत्तेसाठी सर्व काही असून भविष्यात स्वच्छ चेहरा घेवून एखादे नवीन मंडळ तयार झाल्यास सामान्य सभासदांना नवल वाटणार नाही. मागील साडेचार वर्ष व्याजदरावर मूग गिळून बसणार्या सत्ताधार्यांची आगामी निवडणुका सामोरे ठेवून डरावडराव सुरु झाली असून हे न समजण्याइतके सभासदांना दुधखुळे समजू नये. सभासद हिताचा कळवळा दाखविण्यापेक्षा तसेच व्याजदर कपातीचे श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचा फार्स करण्यापेक्षा रोहकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाने सत्तेतून पायउतार व्हावे, अशी टीका बहुजन मंडळाने केली आहे. शिक्षकबँक सत्ताधार्यांनी चक्रवाढ पद्धतीने आकारणी करणारे तुघलकी सॉफ्टवेअर त्वरित बंद करून सभासदांचे आर्थिक शोषण थांबवावे व इतर बँकांप्रमाणे व्याजदर कपातीचा निर्णय घ्यावा, सभासदहिताचे निर्णय घेऊन दिलासा द्यावा, असे आवाहन आयडियल बहुजन टीचर्स असोशिएशन (इब्टा)चे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ यांनी केले आहे.
या इब्टा संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकावर गौतम मिसाळ, एकनाथ व्यवहारे, अशोक नेवसे, आबासाहेब लोंढे, विजय काटकर बाळासाहेब पोळ, आबासाहेब लोंढे, नवनाथ अडसूळ, भागवत लेंडे, अरुण मोकळ, सुहास पवार, बाळासाहेब मोरे, अनिल साळवे, संजय लाड, मिलिंद खंडीझोड, बाबासाहेब जाधव, प्रल्हाद वाकडे, राजेंद्र रोकडे, राजेंद्र कडलग, अशोक देशमुख, अविनाश बोधक, संदेश बार्से, रवी रुपवते, सुनिल गायकवाड, रामभाऊ गवळी, मारुती वाघ, शिवाजी पटारे, संतोष शिंदे, राजेंद्र मेहेरखांब, संतोष शिंदे, मच्छिंद्र तरटे, संजय बडे, दत्तात्रय गदादे, बापूराव खामकर, मच्छिंद्र चाकने, अशोक राऊत, विजय चिकने, अण्णासाहेब शिंदे, प्रकाश पटेकर, देवराम लगड, सुभाष बगनर, रविंद्र होले, अशोक राऊत, जालिंदर राऊत, आजिनाथ भडके, परिमल बनसोडे,दिलीप खराडे, राजेंद्र गागरे आदीचा स्वाक्षरी आहेत.