ब्रिटनला सोडले मागे; अमेरिका, ब्राझिल, रशियानंतर भारतात कोरोनाची सर्वात जास्त रुग्णसंख्या
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोरोनामुळे सगळ्यात जास्त प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. याबाबतीत भारताने ब्रिटनला नुकतेच पाठामागे टाकले आहे. अमेरिका, ब्राझिल व रशियानंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.
आतापर्यंत देशात 02 लाख 93 हजार केसेस आढळल्या असून 7 हजार 400 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये 02 लाख 91 हजार 558 लोग कोरोना संक्रमित आहे. तर अमेरिकेत सगळ्यात जास्त 20 लाख केसेस असून नंतर ब्राझीलचा नंबर लागतो तिथे 7.5 लाख लोक संक्रमित आहेत. तर रशियात 4 लाख 93 हजार केस आढळल्या आहेत.