प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नेवासा – शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी याआधी नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल त्यांना भारत सरकारच्या वतीने आंतरिक सेवा पदक जाहीर झाले आहे.
पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी याआधी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सेवा केली होती. तेथील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या सेवेबद्दल त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. सध्या शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मंदार जवळे यांनी आपल्या कार्य क्षेत्रातील पाथर्डी, शेवगाव, नेवासा, शनिशिंगणापूर, सोनई या पोलिस स्टेशन अंतर्गत या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तंटामुक्ती गावासह जातीय सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी मोठे काम उभे केले आहे.

पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांना भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आंतरिक सेवा पदकाबद्दल त्यांचे अनेक हितचिंतकांनी भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.