Rahata : शहरात नवीन तीन रुग्ण आढळल्याने खळबळ

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहाता – शहरातील पहिल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राहाता शहरात पुन्हा तीन कोरोना बाधित आढळल्याने शहरात खळबळ उडाली असून कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर पॉझिटिव्ह झालेले तीनही व्यक्ती पुरुष असून ते कंटेनमेंट झोनमधील आहेत.

शहरात दुपारनंतर या तीन व्यक्तींच्या पॉझिटिव्ह संदर्भातील बातमी पसरल्यानंतर नागरिकांमध्ये मोठे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने या तिघांच्या घरी जाऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी सुरू केली असून त्यांच्या कुटुंबीयांना शिर्डी येथील केअर सेंटरमध्ये नेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. तर नंतर त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करून त्यांची स्वॅब नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे.

शहरात आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता चार झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील बाजारपेठ काही दिवस लाॅकडाऊन ठेवावी अशी दबक्या आवाजात चर्चा काही सुज्ञ नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, आज झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या अनेकांचे धाबे दणाणून गेले आहे. राहाता शहरात आता नागरिकांनी सतर्क राहणे व कोरोना विषयी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचे पाय राहाता शहरात पसरण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य विषयक सर्व उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आव्हान प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here