प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अजनुज – येत्या पावसाळी अधिवेशनात उच्च माध्यमिक शाळा अनुदान संदर्भात लक्षवेधी प्रश्न मांडण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे श्रीगोंदा तालुका विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कॄती समितीचे अध्यक्ष प्रा.दादासाहेब गिरमकर व सचिव प्रा.नितीन झणझणे यांनी साकडे घातले आहे.

आज काष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रा.गिरमकर यांनी म्हटले आहे की जे अघोषित आहे. त्यांना लवकरात लवकर घोषित करुन २० टक्के व जे घोषित आहेत. त्यांना ४० टक्के अनुदान देण्यात यावे. गेली १८ वर्ष विनापगारी शिक्षक बांधव काम करत आहेत. त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे म्हटले आहे. आमदार पाचपुते यांनी सांगितले की येत्या पावसाळी अधिवेशनात हा लक्षवेधी प्रश्न मांडण्यात येईल, असे पाचपुते यांनी सांगितले.