Shrirampur : रिकव्हरीच्या नावाखाली उक्कलगावमधील राष्ट्रीयकृत बॅंकेचा कर्ज देण्यास नकार

0
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून तक्रारीची काही तासात दखल
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उक्कलगाव : सेन्ट्रल बँकेकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पाञ लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. थकित असणार्‍या रिकव्हरीच्या नावाखाली राष्ट्रीयकृत बॅंकेचा मनमानी कारभारामुळे वैयक्तिक कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ होत असल्याने लाभार्थ्यांत संतापाची लाट पसरली. येथील सहा गावांमधून असणार्‍या राष्ट्रीयकृत बॅंकेची सेंट्रल बॅक ऑफ इंडियाची येथे एक शाखा आहे. येथील राष्ट्रीयकृत बॅंकेत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविले जात असल्याने त्या अंतर्गत महामंडळाने हमी घेतलेल्या वैयक्तिक परतावा कर्ज मिल्क व डेअरी फार्मसाठी कर्ज देण्यास नकार दिला जात आहे.
कर्ज परतावा परतफेडसाठी महामंडळाने त्यांची हमी घेतली आहे. बँकेची रिकव्हरी नसल्याने कर्ज वाटप करण्यात येत नाहीत, असे लाभार्थ्यांना शाखा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबधितांना कर्ज मिळत नसल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अध्यक्ष कॅबिनेट दर्जाचे नरेंद्र पाटील यांच्याशी काही तासातच संपर्क साधला असता संबंधितांनी कर्ज मिळत नसल्यास त्यांच्याकडेच तक्रारी केल्या.
नरेंद्र पाटील यांनी तक्रारीची दखल घेत महामंडळाच्या समन्वयकांना सूचना केल्या असून सूचनेची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे अहमदनगर जिल्हा समन्वयक अरूण निमसे हे उक्कलगावात दाखल होऊन अधिकाऱ्यास विचारणा केली. कर्ज मंजुरी मिळत असतानाच अशा प्रकारे त्यांची टाळाटाळ का केली. तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अशाने अडवणूक होत असल्यामूळे तलसीलदारांशी बोलणार असल्याचे अरूण निमसे यांनी सांगितले याबाबतीत वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी म्हणाले. शाखाधिकारी यादव हे बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे निमसे यांनी सांगितले.
नरेंद्र पाटील यांच्याकडून काही तासातच दखल
उक्कलगाव येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पाञ लाभार्थ्यांना कर्ज देण्यास नकार दिल्याने सदर लाभार्थ्याने याबाबतची तक्रार महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी सदर तक्रारीची अवघ्या काही तासातच दखल घेतल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here