Twitter War : अर्थमंत्री निर्मला सितारमण व इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यात चकमक

0

वाचा कोण-कोणाला काय म्हणाले

अर्थव्यवस्था एकदम सुरक्षित हातात आहे, अशा शब्दांत अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इतिहासकार रामचंद्र गुहा यांना सुनावले.

अर्थमंत्री निर्मला सितारमण व इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यात सध्या ट्विटर युद्ध सुरू आहे. गुहा यांच्या गुजरातवरील एका टिप्पणीमुळे हे युद्ध सुरु झाले. सुरुवातीला ही चकमक गुहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यात होती. नंतर निर्मला यांनी ट्विट केल्यामुळे गुहा आणि सितारमण यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे.

गुहा यांनी 1939 मध्ये ब्रिटिशांनी लिहिलेल्या एका वाक्याचा संदर्भ देत ट्विट केले की गुजरात आर्थिक रुपाने समृद्ध आहे. मात्र, सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला आहे. या उलट बंगाल आर्थिक दृष्टीने तितकासा समृद्ध नाही, मात्र सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध आहे.

यावर गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांनी गुहा यांना सुनावले पूर्वी ब्रिटीश भारताला तोडण्याच्या प्रयत्नात होते, तर आता तुमच्यासारखे बुद्धिजीवी लोग भारताला तोडू इच्छितात. गुजरात आणि बंगाल दोन्हीही महान राज्ये असून आमच्या आर्थिक महत्वाकांक्षा उच्च आहे.

याच ट्विटरवर निर्मला यांनीही गुहा यांना फटकारत म्हटले ब्रिटिश जेव्हा हे लिहित होते त्यावेळी जामनगरचे महाराज दिग्विजय सिंह जडेजा पोलंडच्या 1000 मुलांना वाचवत होते. यावर गुहा यांनी निर्मला यांना आतातर अर्थमंत्रीसुद्धा टीका करायला लागल्या म्हणजे अर्थव्यवस्था निश्चितच सुरक्षित हातात आहे, असा टोला लगावला.

यावर वित्तमंत्र्यांनी होय अर्थव्यवस्था निश्चितच सुरक्षित हातात आहे, काळजी नसावी. इतिहासात रुची असणे हे स्वाभाविक आहे, तुमच्या सारख्या बुद्धिजीवींना हे कळायला हवे, असे फटकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here