Jalna : जिल्ह्यात 26 जण कोरोना पॉझिटिव्ह; तिघांना डिस्चार्ज

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – जिल्ह्यात तसेच दि. 11 जुन 2020 रोजी 26 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातून पिंपळगांव ता. जालना येथील 35 वर्षीय पुरुष, बदनापुर येथील 60 वर्षीय महिला, बदनापूर येथील 10 वर्षीय मुलगा असे एकूण 3 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
यामध्ये जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर येथील 07, किल्ला परिसरातील 11, राजेगांव ता. घनसावंगी येथील 01, पारडगांव ता. घनसावंगी येथील 01, जालना शहरातील पोलीस कॉर्टर येथील 02, गुडला गल्ली परिसरातील 02, लक्कडकोट परिसरातील 01 तसेच नानक निवास येथील 01, अशा एकूण 26 व्यक्तींचा समावेश आहे.
मदिना चौक अंबड परिसरातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षीय पुरुष दि. 4 जून 2020 रोजी हृदयाचा आजार, उच्च रक्तदाबाचा त्रास व न्युमोनिया असल्या कारणाने त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यावस्थ परिस्थितीत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधितांच्या स्वॅबचा अहवाल दि. 5 जून 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू दि. 11 जून 2020 रोजी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here