प्रतिनिधी | किरण चंदेल | राष्ट्र सह्याद्री
सोनई – पहिल्याच पावसाने सोनईकरांचे हाल झाले. पाऊस दमदार झाला. बळीराजा सुखावला. मात्र रस्त्यांच्या दुर्दशेने सामान्य सोनईकरांचे चाांगलेच हाल झाले. त्यामुळे लवकरात लवकर परिस्थिती बदल करण्याची मागणी गावक-यांमधून होत आहे.

सोनईचे व्यापारी व जनता पावसाळ्यात त्रासिक होते. ती गावातील रस्त्यांमुळे आता कुठे पावसाळा सुरु झाला पण पावसामुळे गावातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून या रस्त्यावर पायी चालणे देखिल मुश्कील झाले आहे. दुचाकी व चारचाकी वाहन जीव मुठीत धरुन चालवावी लागतात. याकडे सोनई ग्रामपंचायत लक्ष देईल का ? गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आहे की नाही, असा सवाल भाजपचे शहर अध्यक्ष अॅड प्रफुल्ल जाधव यांनी केला आहे.
स्वामी विवेकानंद चौकात रस्त्यावर पाणी साचले असून या पाण्यात तळीराम मनसोक्तपणे खेळत असून अप्रत्यक्षपणे ग्रामपंचायतचे लक्तर वेशीवर टांगले आहेत. कॅबिनेट मंत्र्यांच्याच गावात ही परिस्थिती असून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट तातडीने लावावी, अशी मागणी गावकरी करत आहेच.
पावसाने बळीराजा सुखावला…
पावसाळा तसा वेळेवर सुरु झाला ३१ मे रोजी सोनई परिसराला पावसाने झोडपले. पहिलाच पाऊस दमदार झाल्याने शेतकरी वर्ग शेती कामात व्यस्त झाला. पेरणीसाठी रान तयार करणे भुईमुगाच्या शेंगा काढणे, बी बियाणे, खत खरेदी तयार झालेला कांदा भुईमूग बाजारात वेळेवर गेला पाहिजे. या धावपळीत आहे. पाऊस आल्याने आनंदी आहे.