Shrigonda : न्यायालयाचा आदेशानंतरही गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत मिळेना…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील मच्छिंद्र मुरलीधर सुद्रिक (रा. लोखंडेवाडी, वडाळीरोड, श्रीगोंदा) यांची दुचाकी दि.२० मे रोजी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यात जप्त केली होती. ही दुचाकी न्यायालयाच्या आदेशानंतरही श्रीगोंदा पोलिसांकडून माघारी मिळत नसल्याने सुद्रिक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी श्रीगोंदा शहरातील हॉटेलवर छापा टाकून तेथे मुद्देमाल व दुचाकी वाहन क्र.एम.एच.१६ सी.पी .७१८५ हे जप्त करण्यात आले होते. दि. ०९ जून रोजी न्यायालयाने जप्त केलेली दुचाकी माघारी देण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची न्यायालयीन प्रत पोलीस ठाण्यात देऊन दुचाकीची मागणी केली. मात्र, पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमाल जमा करताना संबंधित दुचाकीची चावी जमा केली नसल्याचे पो.कॉ.शेगर यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाचा आदेशानंतरही दुचाकी मिळू न शकल्याने दुचाकी मालक मच्छिंद्र सुद्रिक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाविरूद्ध निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना विचारले असता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जप्त केलेल्या मुद्देमालात दुचाकीची चावी पोलीस ठाण्यात जमा केलेली नाही, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here