आजीची कोरोनावर मात; संगमनेरमध्ये आणखी सात बाधित
कोरोनामीटर
एकूण कोरोनाबाधित- 246
कोरोनामुक्त- 186
रुगणालयात दाखल- 49
निगेटिव्ह- 2960
रिजेक्टेड 27
निष्कर्ष न निघालेले 18
प्रतीक्षेत अहवाल- 27
एकूण स्त्राव तपासणी- 3266
विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नगर : नगर शहरातील माळीवाडयातील एका 70 वर्षांच्या आजीबाईंना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते; मात्र आजीबाईंनी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. हीच गोष्ट संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एका 13 महिन्यांच्या चिमुकलीची!
कुटुंबातील सदस्याला झालेला कोरोना संगमनेर तालुक्यातील या 13 महिन्याच्या मुलीपर्यंत पोहोचला. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिने कोरोनावर मात केली. ती घरी पोचली. माळीवाड्यातील आजीही कोरोनावर मात करण्याच्या जिद्धीने लढल्या. त्याही सुखरुप घरी पोचल्या. उपचारांना योग्य प्रतिसाद दिला तर कोरोना पराभूत होऊ शकतो हेच या आजीबाई आणि चिमुकलीने दाखवून दिले आहे. या दोघी सोबतच एकूण 19 रुग्ण आज कोरोनातून बरे झाले. बूथ हॉस्पिटलमधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचा-यांनी या रुग्णांना निरोप दिला आणि पुढील चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या आज बरे होऊन घरी परतल्या आहेत. (पान नं.2 वर)