महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी नाही

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून गडबड, गोंधळ करू नका. विनाकारण कुठेही गर्दी करू नका,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याचे वृत्त समाज माध्यमातून पसरले होते. त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा टाळेबंदी लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणार्‍या पसरविणार्‍या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
’आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू (पान नं.2 वर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here