Beed : शहरातील हिनानगर येथे कन्टेनमेंट झोन घोषित; पूर्णवेळ संचारबंदी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरातील हिना नगर येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील हिना नगर येथील गुलाब मुब्बाशीर अहमद यांच्या घरापासून ते हीना पेट्रोल पंप पर्यंत हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here