National : कोरोनावर औषध शोधल्याचा योगगुरू रामदेव बाबा यांचा दावा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनावर औषध शोधल्याचा योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावर प्रभावी औषध सोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रामदेव बाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

कोरोनावर श्वासारी नावाचे एक औषध शोधले असून गिलोय, तुलसी घनवटी आणि अश्वगंधा कॅप्सूल यांमुळे कोरोना 99.99 टक्के बरा होतो, असा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. तसेच याची क्लिनिकल टेस्ट झाली असून क्लिनिकल ट्रायल लवकरच पूर्ण होणार आहे. भारत सरकारच्या ज्या संस्था आहेत त्याच्या अंतर्गत राहुनच हे सर्व संशोधन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती स्वामी रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.

तसेच मान्यता मिळाल्यास ही भारताची खूप मोठी उपलब्धी असणार आहे. संपूर्ण जग पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे वळेन असेही यावेळी त्यांनी सांगितले. या औषधांच्या जोडीला योग आणि प्राणायाम करणे हे ही अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here