Twitter News : आदित्य ठाकरेंचा दिशा पटाणीला रिप्लाय, ‘Same To You, Disha’

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आदित्य ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांना अभिनेत्री दिशा पटानीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला सेम टू यू म्हणत आदित्यनेही दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या आधी दोघे एकसोबत डिनरला गेल्याने चर्चा होती. त्यातच दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असल्याने व दोघे एकमेकांना ट्विटरवर सतत जॉईंट असल्याने दोघांच्या अफेअरची पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे.

एम. एस. धोनी चित्रपटातून दिशाने बॉलीवूड पदार्पण केले आहे. त्यानंतर बागी, मलंग, असे काही तिचे मोजके चित्रपट गाजले आहेत. पण टायगर श्रॉफ याच्या सोबतच्या अफेअर मुळे ती चर्चेत असते.

मात्र, गेल्या वर्षी आदित्य ठाकरे आणि दिशा दोघांना एकसोबत डिनरला जाताना पाहण्यात आले. मात्र दोघेही आपल्या मैत्रिबद्दल खुलून बोलत नाही. तरी आदित्याच्या आयुष्याला आता नवी दिशा केव्हा मिळणार असा प्रश्नांचा भडीमार आदित्य ठाकरे यांच्यावर होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here