Happy BirthDay : ‘सुदामाचे राजधन’ बाळा नांदगावकर, संजय राऊत यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असून कोरोना मुळे त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात बाळा नांदगावकर यांच्यापासून संजय राऊत यांच्या पर्यंत सगळ्यांचे ट्विट वाचण्या सारखे आहेत. 

बाळा नांदगावकर यांना सुदामाचे राजधन असे म्हणत तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, असे म्हणत या संदेशातून आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचा नांदगावकर यांचे ट्विट.

“सुदामाचे राजधन” सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते.

मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे “राजधन”.

योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा “कृष्णकुंज”च आहे. या लॉक डाउन मुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे…

” साहेबा प्राण तळमळला” पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू. आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन “तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए” आपला नम्र बाळा नांदगावकर, असे ट्विट करीत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here