Education: 15 जूनपासून शाळा नाहीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ‘ही’ माहिती…

0

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः राज्यात उद्यापासून (ता.१५) शाळा सुरु होणार की नाहीत यावरून चांगलाच संभ्रम पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे खुलासा केला आहे. उद्यापासून शाळा सुरू होणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार कपिल पाटील यांना आज (ता.१४) रात्री उशिरा सांगितले.

 सोमवार, १५ जूनपासून राज्यातील शाळा सुरू करणार असल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन उडालेला गोंधळ अखेर रविवारी रात्री थांबला. शाळा कधी सुरू करायचा याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असून सोमवारपासून मात्र शाळा सुरू होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकभारतीचे विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याच्या आदेशावरून निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती दिली. तसेच शाळांना स्पष्ट आदेश गेले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले,

सोमवारी विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये शाळा कधी सुरू होणार याबाबतची माहिती शासन लवकरच देईल,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


आमदार पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचीही भेट घेतली. त्यावर गायकवाड म्हणाल्या…

१५ जून रोजी शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या त्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here