Shrigonda : खंडेश्वर मंदिरात चोरी; दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील येळपणे गावचे ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिरात शनिवारी रात्री चोरी होऊन सुमारे दोन लाख किमंतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील येळपणे गावचे जागृत असलेले ग्रामदैवत खंडेश्वर महाराज मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून नागरिकांनी खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सुमारे दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत लंपास केले.

घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी रविवारी सकाळी सात वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंदिरात चोरी होऊन खंडेश्वर महाराजांचा चांदीचा मुखवटा व इतर दागिने चोरीस गेल्याची बातमी रविवारी सकाळी वाऱ्यासारखी गावात परसली आणि परिसरातील भाविकांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली. या चोरीचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर लावावा अशी मागणी येळपणे पिसोरे ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here