प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
प्रवरा नदीकाठ परिसरात जोरदार पावसाचे आगमन
उक्कलगाव – मृग नक्षत्राने प्रवरा नदीकाठावरील गावात पावसाने जोरदार हजेरी लावली शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील परिसरात जोरदार पाऊस झाला होता. नदीकाठी असणार्या गावात पावसाने हजेरी लावल्याने ररत्यावर पाणीच पाणी साचले होते. काल पावसाने काही वेळ विश्रांती दिल्यानंतर परिसरात सांयकाळी दहा वाजता सुमारास मुसळधार पाऊस झाला होता. वारा शांत असल्याने परिसरात चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे जिकडेतिकडे पाणीच पाणी साचले होते.
कपाशीच्या सरीत पाणी साचले होते. परिसरात काल झालेल्या पावसाने ओढे नाले वाहते झाले. विहिरी तुडुंब भरल्या होत्या. पावसाने हजेरी लावल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. मुसळधार पावसामुळे द्राक्षांच्या बागेत पाणीच पाणी साचले होते. मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय पर्जन्यमान –
श्रीरामपुर तालुका – आज पाऊस (मि. मी)मधे गाव – श्रीरामपूर – ३५ (मि मी ) एकूण पाऊस (२४६ मि मी), उदिंरगाव – ३० मि मी (एकुण पाऊस १४५ मि मी), बेलापूर – ४३ मि. मी (एकुण पाऊस १५५ मि मी), टाकळीभान- ६८ मि मी( एकुण पाऊस १९३ मि मी)