Jamkhed : नगराध्यक्षासह 10 नगरसेवकांची राष्ट्रवादीत घरवापसी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जामखेड – शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष निखल घायतडक व त्यांचे समर्थक दहा नगरसेवकांनी आपल्या राजीनामा नाट्याला कलाटणी देत आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले आहे. असे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षासह दहा नगरसेवकांची राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी होणार हे निश्चित झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. पण त्यांनी राजकिय दबावाचा शेवटपर्यंत उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ दहा नगरसेवकांनी देखील तातडीने आपल्या नगरसेवक पदांचे राजीनामे नगराध्यक्ष निखल घायतडक यांच्या कडे सोपवले होते. नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी दोन वर्षापूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखल घायतडक नगराध्यक्ष झाले होते.

गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबावतंत्र चालू होते लॉकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसात पून्हा सूरू झाले. याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे दिले होते.

यानंतर काही दिवसांनी नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत विचारविनिमय होऊन नगरपरिषदेचा कार्यकाळ काही महिन्यांवर आला असल्याने शहराच्या विकासकामात अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी आपण सर्वजण मिळून एकजुटीने काम करू असे ठरले. त्यामुळे नगराध्यक्ष निखिल घायतडक सह इतर दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे न देता आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरले आहे.

त्यामुळे काही दिवसात नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवक हे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगणार आसल्याने सध्या भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत ते असलेले नाराज नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवकांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये घरवापसी होणार हे निश्चित मानले जात आहे. कारण राजीनामा दिला तर काहिच सादय होणार नाही याची हे लक्ष्यात घेउन हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी जनतेत चर्चा सुरू आहे. अपुरी राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here