Shrirampur : जैन स्थानकात प्रवचनाचा कार्यक्रम संघाचे अध्यक्ष लोढा यांच्यावर पोलिसात गुन्हा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर : शहरातील शिवाजी रस्त्यावरील जैन स्थानकामध्ये जैन मुनींचा प्रवचनाचा कार्यक्रम घेऊन संचारबंदी कायद्याचे उल्लंघन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जैन स्थानक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांचे विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबतची पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजी रस्त्यावरील जैन स्थानकात रविवार दि 14 जून रोजी पूज्य गुलाब मुनी यांचे प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाबाबत स्थानकवासी संघाचे अध्यक्ष रमेश लोढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून उपस्थित राहण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी व व सर्व धार्मिक स्थळे बंद असताना येथील जैन स्थानकांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावरून शहर पोलिसात रात्री उशिरा स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष लोढा यांच्या विरोधात भादवी 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here