उसात घासून ग्रामस्थांनी केला पाठलाग; व्हिडीओ व्हायरल…
राजमोहम्मद शेख । कोल्हार
कोल्हार :-

येथील शाहनगर बेलापूर रोडलागत निबे पाटील यांच्या शेतात सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान उसात बिबट्या असल्याचे समजल्याने नागरिकांनी त्याचा फटाके वाजून शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी काहींना बिबट्या कटवणात नदीच्या दिशेने पळताना दिसला.
उक्कलगाव येथील बिबट्याने नुकतेच एका शेळीला फस्त करत कालवडीवर हल्ला चढवला. ही घटना ताजी असतानाच उक्कलगाव पासून काही अंतरावर असलेल्या कोल्हार येथे आज सकाळी थेट गावात बिबटया आल्याचे काही नागरिकांनी पाहिले. सुरवातीला ही अफवा असल्याचे वाटले, मात्र नागरिकांनी उसामध्ये जाऊन फटाके फोडले व बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने ऊसातून कटवनात धूम ठोकल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.
याठिकाणी ग्रामपंचायतीने वन खात्याच्या मदतीने तात्काळ पिंजरा लावला. पण बिबट्याचे गावात आगमन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.