तालुका प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
अकोले: तालुक्यातील आैरंगपुर येथील प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतचे माजी सरपंच
भाऊसाहेब शंकर वाळुंज यांचा राहत्या घराजवळ इलेक्ट्रिक विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

अकोले तालुक्यातील आैरंगपुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच, सोसायटीचे माजी चेअरमन,अमृतसागर दुध संघाचे माजी संचालक अशी विविध पदावर काम केलेले माजी आदिवासी विकासमंञी मधुकरराव पिचड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते भाऊसाहेब शंकर वाळुंज यांना आज सायंकाळी घराजवळ इलेक्ट्रिक विजेचा शॅाक लागून मृत्यु झाला आहे. त्यांना अकोले ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले.त्याचे सकाळी शवविच्छेदन होऊन त्यानंतर आैरंगपुर येथे अंत्यविधी होणार आहे.घटनेची माहिती समजताच जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सीताराम पा गायकर यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यानी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली.