‘फेक’ माध्यमांचे ‘पीक’

0

सध्या ईलेक्ट्रानिक प्रसार माध्यमावर फेक न्यूज, यूट्यूब चनेल्स याचे पीक फोफावले आहे. काहिही आगापिछा नसणार्‍या बातम्या, माहिती बिनदिक्कत माध्यमांमध्ये सोडली जाते. वाचणाराही कोणतीही शहानिशा न करता आलेली न्यूज फारवर्ड करतो. अशात-हेने हे अफवांचे पीक फैलावत जाते. इतके की ह्या बातम्या कालांतराने ख-या वाटू लागतात.
खरे तर मोबाईल, अण्ड्राईडस् हि माध्यमेच मुळात अभासी. त्यात अभ्यास नसणारांचे हाती हे बाळ पडल्यावर, विचारायलाच नको!आजकाल काही वाहिन्यांवर ’व्हायरल सत्य’ असा कार्यक्रम सादर होतो. यात व्हायरल झालेल्या कोणत्या बाबी ख-या आणि कोणत्या खोट्या याची पडताळणी होते. फेक न्यूजवर एखादा कार्यक्रम प्रसारित होणे, यावरुन फेक न्यूजची व्याप्ती लक्षात येते.
फेक माध्यमाला फार डोकं लागतं अशातला भाग नाही. कुठलीतरी अज्ञात क्लिप वा फोटो जमवायचे. त्यात फोटोशापीची चालाखी करायची. आपली मन की बात त्यात टाकायची आणि व्हायरल करायची. पुढचे काम विनासायास होत राहाते. अशी खोटी माहिती इतकी पसरते की तिचा प्रतिवाद करणाराला ट्रोल करुन गप्प बसविले जाते. याने समाजामध्ये विश्वासाचे वातावरण न राहाता सामाजिक प्रदुषण वाढत चालले आहे.
फेक न्यूज व माहिती प्रसारणासाठी खास अद्ययावत वाररुम्स आहेत. येथे कोणाला बदनाम करायचे हे ठरविले जाते. नंतर काही संदर्भ नसलेले फोटो, क्लिप्स जमविल्या जातात. विशेषतः बड्या राजकीय व्यक्तींबाबत तर हे जास्त घडते. कोणत्याही स्ञी व पुरुषाचा आक्षेपार्ह पोजमधील फोटो घ्यायचा आणि हव्या त्या व्यक्तीचा फोटोशापी करुन तो टाकायचा. विशेष म्हणजे ज्यांना हा फोटोशापीचा जादूटोणा माहित नाही, ते बिचारे यावर विश्वास ठेवतात!
इतक्यावरच हे थांबलेलं नाही. अनेक यु ट्युब चनल्स सध्या धुमाकुळ घालित आहेत. आपणच जणू ईतिहास संशोधक आहोत या थाटात यांची मांडणी व बनावट माहितीची बेमालूमपणे पेरणी आसते. काहिवाही कागदपञांचे संदर्भ द्यायचे. त्याव्दारे आरोप करायचे. एखाद्या बड्या आसामीचे प्रतिमाभंजन करायचे. हा काही महाभागांचा धंदाच बनलाय. यांचे संदर्भ कोठेही उपलब्ध नसतात. ते फक्त कागद दाखवून हातवारे करीत हा संदर्भ असल्याचा अविर्भाव आणतात. तो इतका नाटकी व अभिनयसंपन्न असतो की ऐकणारा अलगद फसतो!
सध्यातर काही राजकीय कुटुंबांना टार्गेट केलं जातंय. हे मुळचे ह्या धर्माचे नसून ते खरे वेगळ्या धर्माचे आहेत. मग त्यांचे वारस पाक, इराण, अफगाणिस्तानातले आहेत येथपर्यन्त फेकाफेकी. अरे, एवाढं प्रचंड वास्तव इतिहासाकडून आणि इतिहासकाराकडून दुर्लक्षित होईल कसे, याचा वाचणाराने विचार करावा. टाकणाराचा विषयच नाही. कारण त्याला असत्य व विकृतच पसरवायचं असतं. त्यातून बुध्दिभेद करायचा असतो. पण वाचणारे अंधपणे विश्वास ठेवतात आणि सत्य बाजूला राहून असत्य इतिहास बनतो. हे दुर्दैवी आहे. असे कितीतरी यूट्यूब चनेलवाले आहेत की जे धंदेवाईक आहेत. पैसा घेवून ते काहिही इतिहास बनवितात. कोणाविरुध्दही मोहिम चालवितात. मोबदल्यात भरमसाठ कमाई करतात वा खाजगी मतलब साधतात.
यात काही समाजालाही शिकार केलं जातं. यामागे सरळसरळ सामाजिक धृवीकरण व त्यातून राजकीय लाभ उठवायचा हेतू असतो. काहिही संबंध नसलेले अगदी परदेशातले फोटो, चिञफिती याकामी वापरल्या जातात. बारकाईने व डोकं ठिकाणावर ठेवलं तर हि चालाखी लक्षात येते. पण त्या खुबीने डब करुन अशा चपखलपणे प्रसारीत होतात, की बघणाराला ते खरे वाटू लागते. सध्या हा धंदा तेजित आहे. अगदी कोरोनासारखी मानवावरील आपत्तीचाही सामाजिक धृवीकरणासाठी वापर होतोय. इतक्या थरापर्यन्त हा विषय गेलाय.
आजचा चाललेला खेळ हा काहिंना मजा वाटतेय. पण रिकामटेकड्यांचे आणि मनोरुग्णतेचे प्रमाणच इतके वाढले, की ख-याचे खोटे आणि खोट्याचे खरे बनत आहे. हे घातक आहे. यातून तात्पुरता असूरी आनन्द मिळतो, पण दूरगामी दुष्परिणाम संभवतात. अफवा किती जिवघेण्या ठरतात हे आपण कुरमाड रेल्वेप्रकरणी बघितलंय. कोणीतरी बिहारसाठी भुसावळवरुन रेल्वे सोडणार अशी कंडी पिकविली . हे स्थलांतरीत चालते झाले. थकले भागले . विसावा म्हणून रेलेवेरुळावर झोपले, ते कायमचेच!
या एका घटनेवरुन अफवा, फेक न्यूज, फोटोशापीतून सुटणा-या क्लिप्स, भाडोञी यू ट्यूब चनेल्स हि सामाजिक विषवल्ली आहे. समाजासमाजात व्देष निर्माण करणे, एखादी व्यक्ती वा तिचे घराणे यांना अनैतिक ठरविणे, राजकीय, सामाजिक , कौटुंबिक बदनामी करणे यातून अनर्थ होत आहेत. आज हे सुखावणारे असत्य व्हायरलचे पीक तुमच्या घराचाही उंबरठा ओलांडेल. तेव्हा हे फेक माध्यमाचे पीक वेळीच सोंगून त्याचा नायनाट करणे, हेच हिताचे ठरेल.
– भास्कर खंडागळे,
बेलापूर (9890845551)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here