Ayodhya Ram Mandir : भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलला

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 जुलै रोजी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या मंदिराचे भूमिपूजन करणार होते.

राम मंदिर निर्माण ट्रस्टने भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करीत भारताच्या 20 जवानांना शहीद केले आहे. त्यामुळे सध्या मोठ्या तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

2 जुलैला घेण्यात येणा-या या कार्यक्रमासाठी एक महिनापूर्वीच 2 जूनलाच अयोध्यायेथून माती दिल्लीला नेण्यात आली होती. मात्र, आता अनिश्चित कालावधीसाठी भूमिपूजन लांबणीवर पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here