प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. हे दाम्पत्य काल बाधित आढळलेल्या राशीन येथील रुग्णाच्या संपर्कात आले होते. व्यक्तीचे वय ७० तर पत्नीचे वय ६५ आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय, नोडल अधिकारी यांनी दिली.
तर अहमदनगर जिल्ह्यातील १३ रुग्णांची कोरोनावर मात. संगमनेर ०७, राहाता ०३, मनपा ०२ आणि नगर तालुक्यातील एका रुग्णाला आज डिस्चार्ज मिळाला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३३ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह केसेस 34 असून आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या 278 आहे.