मोठी बातमी : अंतिम वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक; इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा नाहीत; एटीकेटीवर अद्याप निर्णय नाही

0

उदय सामंत यांचे युजीसीला पत्र

कोरोनाची परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्याही परीक्षा होणार नाहीत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तरी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनी तसे लिहून दिल्यास त्यांची परीक्षा, घेतली जाईल असेही उदय सामंत म्हणाले. 

तर व्यावसायिक आणि अव्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रमांची परीक्षा घेता येणार नाही. त्याअंतर्गत इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला आहे.

तर एटीकेटीचा निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहिले आहे. त्या विद्यार्थ्यांबाबत कुलगुरुंच्या अंतर्गत समती स्थापून निर्णय घेण्यात येईन, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here